अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो.
जुलै १, इ.स. १९९८ रोजी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले. त्यामुळे अकोला व वाशिम हे दोन नवे जिल्हे निर्माण झाले. जिल्ह्याच्या सीमा उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा तर पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.
अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.कि.मी असून लोकसंख्या १६,३०,२३९ इतकी आहे.
अकोला जिल्हा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.