बीड जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बीड जिल्हा

बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी आहे. जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र बीड हे आहे. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड़ कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. बालाघाट डोंगररांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, उर्दू, तेलुगू या भाषादेखील बोलल्या जातात.

बीड जिल्ह्यातील माजलगाव हा एक सधन तालुका आहे.

बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाविषयी पुराणांमधून उल्लेख येतो असे सांगतात. बीड जिल्हा थंड हवेचे ठिकाणे चिंचोली, सौताडा, चिखली आहेत माजलगाव येथे सिंदफणा नदी असून तिच्यावर धरण बांधलेले आहे. गंगामासला येथें मोरेश्वर गणपती मंदिर आहे. तेलगांव येथे सुंदररावजी सोळंके साखर कारखाना आहे. माजलगाव येथे एक फार जुने महादेवाचे मंदिर आहे.

येळंबघाट बस स्थानकापासून सुमारे 2 ते 3 किमी अंतरावर महादेवाचे जुने मंदिर खूप प्रसिद्ध आहे. येळंब येथील ग्रामीण लोकांच्या माहिती नुसार, हे मंदिर सुमारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी राक्षसांनी महादेवाची तपस्या करण्यासाठी केवळ एकारात्रीत उभारले आहे. या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर जमिनीच्या वरती तर आहेच परंतु महादेवाचे शिवलिंग हे जमिनीच्या अंतर्भागात आहे.

या शिवलिंगावरती पाणी अर्पण करण्यासाठी राक्षसांनी जमिनीच्या अतून एक भुयार बनवले आहे. हे भुयार जवळ जवळ ५००-८०० मी. दूर नदी आहे, त्या नदीला मिळते व नदीतील पाणी शिवलिंगाला स्नान घालते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →