अंबिका मंदिर हे सोलापूरच्या सांगोला शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकातील आहे असे सांगितले जाते. एकाच सिंहासनावर अंबिका माता, तुकाई (तुळजाभवानी) आणि औंधची यमाईदेवी येथे विराजमान आहे, त्यामुळे याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सांगोला शहराचे हे ग्रामदैवत आहे.
चैत्र महिन्यात या मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते. या देवीची भरणारी यात्रा फार प्रसिद्ध आहे. दरवर्षी रथसप्तमीला अंबिका यात्रा भरते.
अंबिका मंदिर (सांगोला)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.