श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक आद्य स्वयंभू शक्तीपीठ आहे. हे आदिशक्तीचे महामातृक स्थान आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून आई अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराची भव्य स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व यामुळे हे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत.
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.