चौंडेश्वरी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे वसलेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर गायमुख नदीच्या काठावर वसलेले आहे. मंदिरात एक मोठी देवीची मूर्ती आहे, ज्याचे डोळे, कान, नाक आणि मुख स्पष्ट दिसते. बाकीचे पूर्ण शरीर जमिनीच्या आत आहे. चौंडेश्वरी माता मोहाडी गावातील तसेच पूर्व विदर्भातील भाविकांचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला विधीवत घटस्थापना करून धार्मिक वातावरणात नवरात्रोत्सव प्रारंभ होतो. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र व जवळच्या मध्य प्रदेश राज्यातील भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्याच्या हेतूने या मंदिरात मोठ्या श्रद्धेने घट (ज्योती कलश) स्थापन करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्री चौंडेश्वरी माता मंदिर (मोहाडी)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.