अंकुर साहित्य संघ ही संस्था ९ ऑगस्ट १९८६ रोजी १९८६ साली वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे स्थापन झाली. तिचे महाराष्ट्र राज्यभर हजारापेक्षा अधिक सभासद आहेत. या संस्थेच्या अकोला, अमरावती, कुऱ्हा (काकोडा), जळगाव, जालना वगैरे अनेक शाखा आहेत. अंकुर साहित्य संघाचे अकोला जिल्ह्यातील चांदूर येथे एक वाचनालय आहे. या वाचनालयातर्फे १९९८सालापासून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात. या संस्थेची ३० वर्षांत अकोला जिल्ह्यात २० साहित्य संमेलने, वाशीम जिल्ह्यात ७, अमरावती जिल्ह्यात ६, सोलापूर जिल्ह्यात ३, यवतमाळ जिल्ह्यात ३, हिंगोलीत २ संमेलने झाली. तर मुंबई, परभणी, वर्धा, नांदेड, सातारा, पुणे आणि गोवा येथे एकदा संमेलन झाले आहे. या ५४ साहित्य संमेलनांतून जवळपास १५ हजारांपेक्षा अधिक नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशात आले. प्रत्येक संमेलनात कथा, कविता, गझल, ललित, बालसाहित्य, समीक्षक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ’अंकुर साहित्य पुरस्कार’, ‘अक्षरतपस्वी’ पुरस्कार, ‘अक्षरवेल’ पुरस्कार, ’बालकवी’ पुरस्कार, आणि महाराष्ट्राबाहेरील कवीसाठी ’बी’ पुरस्कार देते. शाल, श्रीफळ देऊन सत्कार, मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप असते.
अंकुर साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष हिंमत शेगोकार यांचे ऑगस्ट २०१५मध्ये निधन झाले.
अंकुर साहित्य संघाचे ’शब्दांकुर’ नावाचे त्रैमासिक आहे.
अंकुर साहित्य संमेलन
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!