ॲस्पेन (कॉलोराडो)

या विषयातील रहस्ये उलगडा.

ॲस्पेन (कॉलोराडो)

ॲस्पेन (लेखनभेद:आस्पेन) हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर व स्की रिझॉर्ट आहे. हे शहर पिटकिन काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. २०१० च्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६५८ होती.

ह्या भागात मुबलक प्रमाणात असलेल्या ॲस्पेन झाडांमुळे या गावाचे नाव ॲस्पेन ठेवले गेले. पूर्वी चांदीच्या खाणी असलेल्या या शहराची गणना आता जगातील सगळ्यात महागड्या स्की रिझॉर्टमध्ये होते. रोअरिंग फोर्क नदीकाठी वसलेले हे शहर समुद्रसपाटीपासून सुमारे ८,००० फूटांवर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →