अलेक्झांडर राय बाल्डविन (जन्म ३ एप्रिल १९५८) हा एक अमेरिकन अभिनेता, विनोदकार आणि निर्माता आहे. तो विनोदी ते नाट्य अशा विविध शैलींमध्ये प्रमुख आणि सहाय्यक भूमिकांसाठी ओळखला जातो आणि त्याला तीन प्राइमटाइम एम्मी पुरस्कार आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहे तसेच एक अकादमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार यांच्यासाठी नामांकन मिळाली आहेत.
त्याला द कूलर (२००३) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार आणि इट्स कॉम्प्लिकेटेड (२०१०) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्याने द रॉयल टेनेनबॉम्स (२००१), अलॉन्ग केम पॉली (२००४), द एव्हिएटर (२००४), द डिपार्टेड (२००६), टू रोम विथ लव्ह (२०१२), ब्लू जास्मिन (२०१३), मिशन: इम्पॉसिबल –रॉग नेशन (२०१५) आणि मिशन: इम्पॉसिबल – फॉलआउट (२०१८) या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने द बॉस बेबी चित्रपट फ्रँचायझी (२०१७-२२) मध्ये मुख्य भूमिकेला आवाज दिला आहे.
ॲलेक बाल्डविन
या विषयावर तज्ञ बना.