ॲम्स्टरडॅम

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ॲम्स्टरडॅम

अ‍ॅमस्टरडॅम (डच: Amsterdam; उच्चार ) ही नेदरलँड्स देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर हॉलंड ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅमस्टरडॅम शहर उत्तर समुद्राशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे जोडले गेले आहे. २०१० साल अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.

१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्त्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. सध्या नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅमस्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता. येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅमस्टरडॅमचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →