बुखारेस्ट (रोमेनियन: București; उच्चार ) ही रोमेनिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. देशाच्या दक्षिण भागात दांबोविता नदीच्या काठावर वसलेले बुखारेस्ट रोमेनियाचे आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय केंद्र आहे.
१ जुलै २०१० रोजी बुखारेस्ट शहराची लोकसंख्या १९,४२,२५४ इतकी होती. बुखारेस्ट महानगर परिसरात सुमारे २२ लाख लोक राहतात. ह्या बाबतीत युरोपियन संघामध्ये बुखरेस्टचा सहावा क्रमांक लागतो. येथील उल्लेखनीय वास्तू व कलेसाठी बुखारेस्टला लहान पॅरिस (Micul Paris) किंवा पूर्वेकडील पॅरिस ह्या टोपणनावांनी ओळखले जाते.
बुखारेस्ट
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.