अॅनी बेझंट (जन्म: १ ऑक्टोबर १८४७ लंडन - मृत्यू २० सप्टेंबर १९३३, मद्रास, ब्रिटिश वसाहत) या इंग्लंडमध्ये जन्मलेल्या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञानी होत्या. लेखिका आणि व्याख्यात्या म्हणून विख्यात होत्या. त्या स्त्री-सुधारणावादी होत्या.
• भारतीय राजकारणाशी एकनिष्ठ महिला.
• १८९३ मध्ये भारतात आगमन.
• १९१४ 'न्यू इंडिया' वृत्तपत्र काढले.
• १९०७ 'जागतिक थिऑसॉफिकल' सोसायटीची अध्यक्षा.
अॅनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले. 'थिऑसॉफिकल सोसायटी' ही त्यांची संघटना. भारतीय तत्त्वज्ञान, संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्या सहभागी झाल्या. १९१७ च्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. त्यांनी अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक सेवा केली.
ॲनी बेझंट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?