बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (बंगाली: বঙ্কিম চন্দ্র চট্টোপাধ্যায় ; उच्चार: बोंकिमचोंद्रो चोट्टोपाद्धाय) (जन्म : २६ जून १८३८; - ८ एप्रिल १८९४) हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.
बंकिंमचंद्रचा मूळ पिंड लेखकाचा होता. बंगाली मधून लिहलेल्या कादंबऱ्या, कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषामधून अनुवाद झाले. 'राजमोहन्स वाईफ' (इंग्रजी) (१८६४) ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी.
बंकिम चंद्र चॅटर्जी
यामागील विज्ञान आणि इतिहास.