भवानी मंदिर (राजकीय पत्रक)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भवानी मंदिर हे क्रांतिकारक अरविंद घोष यांनी १९०५ मध्ये निनावीपणे लिहिलेले एक राजकीय पत्रक होते.[१] ही पुस्तिका बंगालच्या फाळणीच्या वेळी तयार करण्यात आली होती. अरविंद घोष यांनी ती पुस्तिका लिहिली तेव्हा ते बडोदा संस्थानाच्या सेवेत कार्यरत होते.

बंगाली लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८८२ मध्ये आनंदमठ ही कादंबरी लिहिली होती. त्यापासून प्रेरणा घेत अशा मंदिराच्या उभारणीची संकल्पना श्री. बारीन्द्र घोष (अरविंद घोष यांचे धाकटे बंधू व क्रांतिकारक) यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठीचे लेखन अरविंद घोष यांनी केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →