ॲझोला

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

ॲझोला

ॲझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. ॲझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे (fern) वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी ॲझोला हे पीक महत्त्वाचे आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीरपूक व्यवसाय आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व पशुसंवर्धनाचा मोठा वाटा आहे. अगदी पुरातनकालापासून शेतीला पशुसंवर्धनाची जोड आहे. आजच्या परिस्थितीत युवकांची वाढती बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती तसेच ग्रामीण भागातील महिला व पुरुष बचत गट यांना सुद्धा पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय एकप्रकारे रोजगार निर्मितीचे साधन बनले आहे. परंतु या व्यवसायात दुभत्या जनावरांकडून अपेक्षित दूध उत्पादन मिळवण्यासाठी त्यांना संतुलित आहार देणे गरजेचे आहे. हिरवा चारा खाऊ घालणे ही दूध उत्पादन खर्च कमी करण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची गुरूकेिली आहे. परंतु मागील वर्षी अगदी जूनपासुनच पावसाने पाठ फरवली आहे.

पावसाळी पिकांबरोबरच चाऱ्याच्या पिकांचे उत्पादन धोक्यात आहे. अगोदरच आपल्याकडे असणारी जनावरांची संख्या आणि उपलब्ध चारा, वैरण यामध्ये खूप तफावत आहे. पशुखाद्याच्या किंमती पाहिल्या तर जास्त प्रमाणात पशुखाद्य देणे व्यवसायिकदृष्ट्या परवडत नाही.अशा परिस्थितीत उत्तम व्यवस्थापन करून कमीतकमी खर्चात अधिकाधिक दूध उत्पादन करणे आवश्यक आहे. यासाठी कमी खर्चात व चारा टंचाईत ॲझोलाचा जनावरांच्या आहारात वापर करता येईल. पशुखाद्यात ॲझोलाचा वापर केला तर असे खाद्य किफायतशीर व पौष्टिक बनते. दूध देणाऱ्या जनावरांना महागड्या खाद्याऐवजी ॲझोला खाऊ घातले तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढते. ॲझोला हे खाद्य पशुपालकास नेहमीच्या खाद्यापेक्षा खूप स्वस्त पडते.

ॲझोला ही एक बहुगुणी चमत्कारिक वनस्पती आहे. तिचा प्रसार आणि लागवड वाढल्यास ती बहूपयोगी सिद्ध होऊ शकते.अवघे २ ते ३ सें.मी. आकाराची ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. दर दोन दिवसांनी दुप्पट होण्याची क्रिया सतत सुरू असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →