नॅडेप कंपोस्ट किंवा नॅडेप खत (लेखन भेद: नादेपा, नादेप) हे एक शेती उपयुक्त सेंद्रिय खत असून हे सेंद्रिय तथा रासायनिक शेती या दोन्ही प्रकारात वापरले जाते. या खतामुळे जमिनीस मुख्य तथा सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. याच सोबत जमीन सजीव तथा भुसभुशीत होते. तसेच जमिनीत उपयुक्त असे नैसर्गिक सूक्ष्म जीव आणि गांडुळांची संख्येत लक्षणीय वाढ होते.
नॅडेप कंपोस्ट तयार करण्याची पद्धत ही यवमाळमधील शेतकरी तथा गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक नारायणराव देवराव पांढरीपांडे (नॅडेप काका) यांनी विकसित केली आहे. त्यांच्या पूर्ण नावाची इंग्रजीतील आद्याक्षरे NADEPA वरून महात्मा गांधी यांनी त्यांचे नामकरण नॅडेप असे केले होते.
नॅडेप पद्धतीत शेतातील अवशेष, माती आणि शेण यांचे समप्रमाणात मिश्रण करून जमिनीच्या पृष्ठभागावर टाके तयार करून त्यात कंपोस्ट खत तयार केले जाते. या पद्धतीने एक किलो शेणापासून चार महिन्यांत तीस किलो खत तयार केले जाते. या पद्धतीचा मुख्य फायदा म्हणजे कमी शेणात जवळपास त्याच दर्जाचे कंपोस्ट खत निर्मिती करता येते. नॅडेप कंपोस्ट खालील प्रक्रियेद्वारे तयार केले जाते.
नॅडेप कंपोस्ट
या विषयातील रहस्ये उलगडा.