३ इडियट्स

थोडक्यात पण महत्त्वाचे.

३ इडियट्स

थ्री इडियट्स हा एक २००९ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. चेतन भगतच्या फाइव्ह पॉइंट समवन ह्या पुस्तकावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानीने केले. ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य, मोना सिंग आणि परीक्षित साहनी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २५ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर ह्या चित्रपटाने तिकिट खिडकीवरील सर्व जुने विक्रम तोडले. सध्या तो बॉलिवूडमधील सर्वाधिक मिळकत करणारा चित्रपट आहे. भारताबाहेर देखील ह्या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले.

थ्री इडियट्सला ६ फिल्मफेअर, ३ राष्ट्रीय, १० स्क्रीन इत्यादी एकूण ४० पुरस्कार मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →