२०२५ मिनी एसईए गेम्स ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती, जी २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान मलेशिया येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मलेशिया, बहरैन आणि थायलंड हे तीन संघ सहभागी झाले होते. सर्व सहा सामने बायुएमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळवण्यात आले.
मलेशिया आणि थायलंडसाठी ही स्पर्धा डिसेंबर २०२५ मध्ये थायलंड येथे झालेल्या दक्षिणपूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा भाग होती. मलेशियाने चार सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आणि दोन सामन्यांचा निकाल लागला नाही; सहा गुणांसह मलेशियाने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बहरैन तीन गुणांसह दुसऱ्या, तर थायलंड तीन गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.
२०२५ मिनी एसईए गेम्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.