२०२५ महिला क्रिकेट विश्वचषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही १३वी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होती. १९७८, १९९७ आणि २०१३ नंतर चवथ्यांदा सदर स्पर्धा भारतात आयोजित केली गेली,तर श्रीलंकेची यजमान म्हणून ही पहिलीच स्पर्धा होती. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश होण्याची ही शेवटची वेळ होती. ऑस्ट्रेलियाचा संघ गतविजेता होता, त्यांनी २०२२ मध्ये सातव्यांदा विजेतेपद मिळविले होते. जून २०२५ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) ही स्पर्धा ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणार असल्याचे जाहीर केले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांचे पहिले विश्वचषक विजेतेपद मिळवले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →