२०२५ बाल्टिक चषक ही २६ ते २७ जुलै २०२५ दरम्यान तालिन, एस्टोनिया येथे आयोजित करण्यात आलेली पुरुषांची ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत यजमान एस्टोनिया, फिनलंड, लात्व्हिया आणि लिथुआनिया या चार संघांनी सहभाग घेतला. सर्व सहा सामने एस्टोनियन नॅशनल क्रिकेट अँड रग्बी फील्डच्या दोन मैदानांवर खेळवण्यात आले.
स्पर्धा एकेरी साखळी पद्धतीने खेळवण्यात आली. एस्टोनियाने लिथुआनिया, फिनलंड आणि लात्व्हिया या तिन्ही संघांना पराभूत करून अपराजित विजेतेपद मिळवले. फिनलंडने लात्व्हिया आणि लिथुआनियाविरुद्ध विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले. लात्व्हिया तिसऱ्या, तर लिथुआनिया चौथ्या स्थानावर राहिला.
२०२५ बाल्टिक चषक
यामागील विज्ञान आणि इतिहास.