२०२५ पुरुष खंडीय चषक ही २६ ते २९ जून २०२५ दरम्यान रोमेनियामध्ये आयोजित करण्यात आलेली पुरुषांची आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. स्पर्धेत यजमान रोमेनियासह ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, हंगेरी आणि माल्टा या सहा संघांनी भाग घेतला. सर्व सामने इल्फोव्ह काउंटीतील मोआरा व्लासिए क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आले.
सहा संघांची प्रत्येकी तीन संघांच्या दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर उर्वरित संघ पाचव्या स्थानाच्या सामन्यात खेळले. अंतिम सामन्यात माल्टाने ऑस्ट्रियाचा ४७ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
२०२५ पुरुष कॉन्टिनेंटल चषक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.