२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक अंतिम सामना

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक अंतिम सामना

२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा अंतिम सामना हा ९ मार्च २०२५ रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळला गेलेला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामना होता. हा सामना भारत आणि न्यू झीलंड या संघांदरम्यान खेळला गेला. २००० साली खेळविल्या गेलेल्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि न्यू झीलंड एकमेकांविरुद्ध चॅम्पियन्स चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची ही दुसरी वेळ होती.

न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ७ बाद २५१ धावा केल्या. दुसऱ्या डावात, भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावा केल्या आणि ४ गडी राखून विजय मिळवत आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेचे तिसरे विजेतेपद पटकावले आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व सामने जिंकून अपराजित राहत आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकणारा पहिला संघ बनला. रोहित शर्माला ८३ चेंडूत ७६ धावा केल्याबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →