२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक ही आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याचे आयोजन केले होते आणि त्यात पाकिस्तानमधील तीन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील एका ठिकाणी मिळून १५ सामने खेळवले गेले.

२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून पात्र ठरलेल्या अव्वल आठ क्रमांकाच्या पुरुष राष्ट्रीय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. अफगाणिस्तानने या स्पर्धेत पदार्पण केले.

पाकिस्तान गतविजेता होता पण गट फेरीतूनच त्यांना बाहेर पडावे लागले. अंतिम सामन्यात न्यू झीलंडला हरवून भारताने तिसरे विजेतेपद पटकावले. तीन वेळा चॅम्पियन्स चषक जिंकणारा भारत पहिला संघ ठरला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →