२०२२ जर्सी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा ४ ते १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान जर्सीमध्ये खेळविण्यात आली. सदर स्पर्धा २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेचा एक भाग होती. क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगच्या ब गटातील ही तृतीय व अखेरची फेरी होती. नियोजनानुसार फेरी सप्टेंबर २०२१ मध्ये होणार होते. परंतु कोव्हिड-१९च्या प्रसारामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. सरतेशेवटी स्पर्धा ऑगस्ट २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
पात्रतेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी जर्सी, केन्या आणि युगांडा या तीन देशांमध्ये चुरस होती. जर्सीने सरासरी धावगतीच्या जोरावर युगांडाला मागे टाकले आणि संघ २०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले-ऑफ स्पर्धेसाठी पात्र ठरला व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त केला.
२०२२ जर्सी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.