२०२२ अमेरिका तिरंगी मालिका (बारावी फेरी)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०२२ अमेरिका तिरंगी मालिका ही अमेरिकामध्ये २८ मे ते ४ जून २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. मूलत: ऑगस्ट २०२० मध्ये होणारी स्पर्धा कोव्हिड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आली होती. यजमान अमेरिकासह संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंड या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही बारावी फेरी होती. सर्व सामने पियरलँड मधील मूसा स्टेडियम येथे खेळविण्यात आले.

या फेरीअंती काईल कोएट्झर याने स्कॉटलंडच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →