२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०२१ पोर्तुगाल तिरंगी मालिका ही पोर्तुगालमध्ये १९ ते २२ ऑगस्ट २०२१ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान पोर्तुगालसह माल्टा आणि जिब्राल्टर या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता.

१ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने सर्व सदस्यांना बहाल केलेल्या ट्वेंटी२० दर्जानंतर प्रथमच पोर्तुगाल मध्ये आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले. सर्व सामने अल्बेरगेरिया-ए-वेल्हा मधील गुचेरे क्रिकेट मैदान या मैदानावर खेळविण्यात आले. सदर तिरंगी मालिका गट फेरी या प्रकाराने खेळवली गेली. गट फेरीचे सर्व सामने खेळून झाल्यावर अव्वल स्थानावर असलेल्या संघास विजेते घोषित करण्यात आले.

पोर्तुगालने सर्व ४ सामन्यांमध्ये विजय मिळवत तिरंगी मालिका जिंकली. तर दोन विजयांसह माल्टाला उवविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जिब्राल्टरला एकही सामना जिंकता आला नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →