दिनांक १४ फेब्रुवारी २०१९ला भारतातील जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, लेथापोरा या अवंतीपोराजवळ असलेल्या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाहनांच्या एका ताफ्यावर, दुपारी सुमारे ३.१५ वाजता एका आत्मघाती हल्लेखोराने आपल्या वाहनासकट हल्ला केला. या वाहनात स्फोटके भरलेली होती. ताफ्यातील केंद्रीय राखीव बलातील सुमारे ४० सैनिकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर हल्लेखोरदेखील मरण पावला. या काफिल्यात सुमारे ७८ वाहने व सुमारे २५०० पेक्षा जास्त सैनिक होते. ताफा आपल्या मुक्कामावर सूर्यास्तापूर्वी पोचणे अपेक्षित होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित इस्लामिक गट जैश-ए-महंमदने स्वीकारली होती.;
आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो असे त्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव होते. या अपघातानंतर त्या हल्लेखोराचा एक व्हिडियोपण प्रसृत करण्यात आला.या हल्ल्यात एका महिंद्र स्कॉर्पियो वाहनाचा वापर करण्यात आला होता. या वाहनात सुमारे ३०० किलो स्फोटके असावीत असा प्राथमिक कयास आहे.
२०१९ पुलवामा हल्ला
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.