२०१९ बालाकोट हवाई हल्ला

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२०१९चा बालाकोट हवाई हल्ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील बालाकोट शहरावर केलेला हल्ला होता. हा हल्ला २६ फेब्रुवारी, २०१९ रोजी करण्यात आला. भारतीय वायुसेनेच्या १२ मिराज २००० जेट विमानांनी नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाउन बालाकोटजवळील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. भारतीय सैन्यावर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आलेला आहे असे भारतीय सैन्याने सांगितले.

भारताच्या शासकीय संस्थाद्वारे असे सांगितले जात आहे की, भारतीय हवाई दलाने जैश-ए-महोम्मद या आतंकवादी गटाच्या बालाकोट येथील प्रशिक्षण शिबीरावर हल्ला केला आणि त्यात जवळपास ३५० प्रशिक्षणार्थींना ठार केले आहे. या हवाई हल्ल्यानंतर भारतीय विमाने कोणत्याही अडथळ्याशिवाय भारताच्या भूमीवर परत आलेली आहेत. त्यात भारतीय हवाई दलाला कोणतीही क्षती झालेली नाही .

पाकिस्तानच्या सैन्यदलाने असे जाहिर केले आहे की, जेव्हा भारतीय हवाई दलाच्या विमानांनी मुझफराबाद येथे घुसखोरी करून पाकिस्तानच्या सीमेचे उल्लंघन केले. त्यावर पाकिस्तानी विमानांनी उलट जबाबी कारवाई केली आणि भारतीय विमानांना घाईने परतावे लागले. त्या घाईमध्ये भारतीय विमानांनी त्यांचा पे-लोड म्हणजेच जास्तीचे जड सामान आणि इंधन मोकळ्या जागेत सोडून दिले. जरी ते पाकिस्तानच्या भूभागात पडले असले तरी त्यामुळे कोणतीही जिवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही.

याच घटनेबरोबरच भारत-पाक सीमेवर गोळीबारी सुरू झाली आणि त्यात नियंत्रण रेषेलगतच्या भागात पाकीस्तानच्या चार नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

१९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर दोन्हींही देश अणवस्त्र धारी झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन सैनिकी कारवाई केलेली आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →