म्युन्शेन हत्याकांड पश्चिम जर्मनीच्या म्युन्शेन मधे आयोजित १९७२ च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये झाला ज्यात अकरा इस्रायलचे ऑलिंपिक चमूचे सदस्य बंधक बनवले होते व शेवटी त्यांची हत्या करण्यात आली. तसेच, एक जर्मन पोलीस अधिकारी देखील ठार झाला. हा दहशतवादी हल्ला पॅलेस्टीनी दहशतवादी गट ब्लॅक सप्टेंबरने केला होता, जी पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनची एक तुकडी आहे.
हल्ला सुरू झाल्यानंतर लवकरच, दहशतवाद्यांनी इस्रायलमधील तुरुंगातील २३४ कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली आणि जर्मनीमध्ये बंदिवान असलेल्या लाल सेना गटाचे संस्थापक एंड्रियास बादेर आणि उल्रीके मीनहोफ यांच्या सुटकेची मागणी केली.
म्युन्शेन हत्याकांड
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?