२०१८-१९ विजय हजारे चषक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

२०१८-१९ विजय हजारे चषक भारतामधील विजय हजारे चषकातील १७वी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ८ नवे राज्य पदार्पण करतील. कर्नाटक मागील स्पर्धेतील विजेता आहे.

ही स्पर्धा भारतातील ३७ लिस्ट-अ दर्जा असणाऱ्या संघांमध्ये (राज्य) १९ सप्टेंबर २०१८ पासून २०१८-१९ रणजी ट्रॉफीआधी होईल. एप्रिल २०१८ मध्ये बीसीसीआयने बिहारवरील बंदी काढून बिहारला स्पर्धेत पुन्हा स्थान देऊन संघांची संख्या २९ पर्यंत नेली. परंतु जुलै २०१८ मध्ये बीसीसीआयने ८ नवे राज्य - अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम व उत्तराखंड हे स्पर्धेत पदार्पण करतील.

सर्व संघ ४ गटात बिभागले आहेत:



गट अ - ९ संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)

गट ब - ९ संघ (अव्वल ३ बाद फेरीसाठी पात्र)

गट क - १० संघ (अव्वल २ बाद फेरीसाठी पात्र)

प्लेट गट - ९ संघ (८ नवे) (अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →