२४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१६ दरम्यान खेळविली गेलेली २०१६ आशिया कप ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती. सदर स्पर्धेचे हे १३वे व बांग्लादेशमध्ये होणारे ५वे वर्ष होते. ही स्पर्धा प्रथमच ट्वेंटी२० प्रकारात खेळविली गेली. यजमान बांग्लादेश शिवाय या स्पर्धेत श्रीलंका, भारत, पाकिस्तान व १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या २०१६ आशिया कप पात्रता स्पर्धेचा विजेता संग सहभागी झाले. ६ मार्च २०१६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवून भारतीय संघाने सदर स्पर्धा सहाव्यांदा जिंकली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१६ आशिया चषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?