२००२ फिफा विश्वचषक, मे ३१ ते जून ३०, इ.स. २००२ दरम्यान दक्षिण कोरिया व जपान येथे आयोजित केला गेला होता. क्रमानुसार ही १७वी फिफा विश्वचषक स्पर्धा होती. मे १९९६मध्ये या दोन देशांना यजमानपद देण्याचे ठरले. अशाप्रकारे दोन देशांत ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची ही प्रथमच वेळ होती. दक्षिण अमेरिका, युरोप व उत्तर अमेरिकेबाहेर व आशियामध्ये ही स्पर्धा होण्याचीही ही प्रथमच वेळ होती.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझिलने जर्मनीला २-० असे हरवून पाचव्यांदा विश्वचषक जिंकला.
२००२ फिफा विश्वचषक
यामागील विज्ञान आणि इतिहास.