१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक ही एक महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १९-२१ जुलै १९८९ दरम्यान डेन्मार्कमध्ये आयोजित केली गेली होती. युरोपियन क्रिकेट संघटनेद्वारे सुरू केलेल्या युरोप महिला क्रिकेट चषक स्पर्धेची ही पहिली आवृत्ती होती. सर्व सामन्यांना हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
दर्जा होता. यजमान डेन्मार्कसह, इंग्लंड, आयर्लंड आणि नेदरलँड्स या चार देशांच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. नायकाबिंग मोर्स मधील नायकाबिंग मोर्स क्रिकेट क्लब मैदानवर सर्व सामने झाले.
डेन्मार्क महिला संघाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. तसेच डेन्मार्कमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. सदर स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने इतर संघांशी एक सामना खेळला. इंग्लंडने सर्व तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत स्पर्धा जिंकली. डेन्मार्कला सरासरी धावगतीच्या जोरावर २ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जो चेम्बरलेन हिला सर्वाधिक गडी बाद केल्यामुळे मालिकावीर घोषित केले गेले. इंग्लंडच्याच वेंडी वॉट्सन हिने स्पर्धेत सर्वाधिक १२४ धावा केल्या.
१९८९ युरोप महिला क्रिकेट चषक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.