१९८४ लोकसभा निवडणुका

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

१९८४ च्या लोकसभा निवडणुका या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर २४, २७ आणि २८ डिसेंबर १९८४ रोजी भारतात घेण्यात आल्या. तरीही चालू बंडामुळे आसाम आणि पंजाबमधील मतदान १९८५ पर्यंत लांबले होते.

या निवडणुकीत राजीव गांधी (इंदिरा गांधींचे पुत्र) यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) पक्षाने प्रचंड विजय नोंदवला, व ५१४ जागांपैकी ४०४ जागा जिंकल्या आणि विलंब झालेल्या जागांमधुन आणखी १० जागा जिंकल्या. आंध्र प्रदेश राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष एन.टी. रामाराव यांचा तेलुगू देसम पक्ष ३० जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. अशा प्रकारे राष्ट्रीय विरोधी पक्ष बनण्याचा हा पहिला प्रादेशिक पक्षाचा मान मिळवला. तामिळनाडूच्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने काँग्रेससोबत युती करून १२ जागा जिंकल्या.

नोव्हेंबरमध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आणि १९८४ च्या शीखविरोधी दंगलीनंतर लगेचच मतदान घेण्यात आले आणि गांधींच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक शोक झाल्यामुळे बहुतांश भारतीय मतदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला.

१९८४ नंतर २०१४ मध्येच एखाच्या पक्षाने बहुमताने जागा जिंकल्या होत्या आणि आजपर्यंतची ही एकमेव वेळ होती ज्यामध्ये एका पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →