ह्युयी त्लातोआनी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ह्युयी ट्लाटोवानी (नाहुआट्ल "मोठा वक्ता") या शब्दाचा उयी ट्लाटोवानी, किंवा ह्युय ट्लाहटोआनी असाही उच्चार केला जातो. (अनेकवचन हुयी ट्लाटोक) ही नाहुआट्ल पदवी मेक्सिकनांच्या (अस्तेक) सम्राटांकरिता वापरली जाते. ते टेनोच्टिट्लान या अझ्टेक राजधानीचे राज्यकर्ते होते, त्याचप्रमाणे टेनोच्टिट्लान, टेक्सकोको, आणि ट्लाकोपान यांच्या तिहेरी मित्रराष्ट्रांचे मुख्याधिकारीही होते.

ट्लाटोवानी ह्या पदवीचे भाषांतर "अझ्टेक सम्राट" असे केले जाते. एखाद्या ट्लाटोवानीनंतर येणारा ट्लाटोवानी वारसाहक्काने गादीवर येत नसे. अझ्टेक जाणकारांकडून एकमताने पुढचा ट्लाटोवानी निवडला जाई. ट्लाटोनी हा सरकारी यंत्रणांचा आणि सैन्याचा मुख्याअधिकारी असे, त्याचप्रमाणे मेक्सिकनांचा सर्वोच्च धर्मगुरूही असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →