अझ्टेक ग्रंथ हे कोलंबसपूर्व आणि स्पॅनिश वसाहतयुगात अझ्टेकांकडून लिहिले गेले. अस्तेक संस्कृतीबद्दल महत्त्वाच्या माहितींसाठी प्राथमिक स्रोत म्हणून ह्या ग्रंथांकडे पाहिले जाते.
प्री-कोलंबियन ग्रंथ युरोपियन ग्रंथापेक्षा वेगळे असून, त्यात काही वृत्तांत लिहिले नाही किंवा अझ्टेक भाषेप्रमाणे अर्थपूर्ण चिन्हांकीत अक्षरेही नाहीत, त्यात केवळ बरीच मोठी चित्रे आहेत. वसाहतयुगातील ग्रंथांत चित्रांबरोबर अभिजात नाहुआट्ल (लॅटिन लिपीत), स्पॅनिश, आणि काही प्रमाणात लॅटिनमध्ये लिहिलेले मजकूर आहेत.
जरी अझ्टेकांवर स्पॅनिशांनी विजय मिळवण्यापूर्वीची काही ग्रंथ वाचले असले तरी वसाहती संस्कृतीत ते स्थित्यंतरीत होण्यापसून ट्लाक्युइलोंनी (ग्रंथ रंगविणारा) वाचवायचा प्रयत्न केला. सध्यस्थितीत शास्त्रज्ञ ५०० च्या जवळपास वसाहतयुगातील ग्रंथे पाहू शकतात.
अस्तेक प्राचीन ग्रंथ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.