हेलन हेस

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

हेलन हेस

हेलन हेस मॅकआर्थर (पुर्वाश्रमीच्या ब्राऊन; १० ऑक्टोबर १९०० - १७ मार्च १९९३) एक अमेरिकन अभिनेत्री होती जिची कारकीर्द ८२ वर्षांची होती. तिला अखेरीस "फर्स्ट लेडी ऑफ अमेरिकन थिएटर" हे टोपणनाव मिळाले होते आणि एमी, ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी अवॉर्ड जिंकणारी दुसरी व्यक्ती आणि पहिली महिला होती. अभिनयाचा तिहेरी मुकुट जिंकणारी ती पहिली व्यक्ती होती. हेस यांना १९८६ मध्ये राष्ट्राध्यक्ष रॉनल्ड रेगन यांच्याकडून प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम, अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्राप्त झाला. १९८८ मध्ये तिला नॅशनल मेडल ऑफ आर्ट्सने सन्मानित करण्यात आले.

१९८४ पासून वॉशिंग्टन डीसी मधील व्यावसायिक नाटकांमधील उत्कृष्टतेला मान्यता देणारे वार्षिक हेलन हेस पुरस्कार हे तिच्या नावावर आहे. १९५५ मध्ये, न्यू यॉर्क शहरातील थिएटर डिस्ट्रिक्टमधील ४६ व्या स्ट्रीटवरील पूर्वीच्या फुल्टन थिएटरचे हेलन हेस थिएटर असे नामकरण करण्यात आले. १९८२ मध्ये जेव्हा ते ठिकाण पाडण्यात आले तेव्हा तिच्या सन्मानार्थ जवळच्या लिटल थिएटरचे नामकरण करण्यात आले. हेलन हेस यांना २० व्या शतकातील नाटकातल्या महान आघाडीच्या महिलांपैकी एक मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →