डेन्झेल वॉशिंग्टन

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डेन्झेल वॉशिंग्टन

डेन्झेल हेस वॉशिंग्टन जूनियर (जन्म २८ डिसेंबर १९५४) एक अमेरिकन अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. चार दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत, वॉशिंग्टनला एक टोनी पुरस्कार, दोन अकादमी पुरस्कार, तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन सिल्व्हर बेअर्ससह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २०१६ मध्ये सेसिल बी. डेमिल लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड, २०१९ मध्ये AFI लाइफ अचिव्हमेंट अवॉर्ड आणि २०२० मध्ये न्यू यॉर्क टाइम्सने त्यांना २१ व्या शतकातील महान अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. २०२२ मध्ये, वॉशिंग्टनला प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम मिळाले.

वॉशिंग्टनला ग्लोरी (१९८९) मधील अमेरिकन गृहयुद्धातील सैनिकाच्या भूमिकेसाठी आणि ट्रेनिंग डे (२००१) मध्ये भ्रष्ट पोलिसाच्या भूमिकेसाठी क्रमष: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा व सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

वॉशिंग्टनने चेकमेट्स (१९८८) मध्ये ब्रॉडवे पदार्पण केले. २०१० मध्ये ऑगस्ट विल्सनच्या फेन्सेस नाटकाच्या ब्रॉडवे पुनरुज्जीवनात अभिनय केल्याबद्दल त्याला नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा टोनी पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →