हेमानंद बिस्वाल (१ डिसेंबर १९३९ - २५ फेब्रुवारी २०२२) हे भारतीय राजकारणी होते. बिस्वाल यांनी डिसेंबर १९८९ ते मार्च १९९० आणि पुन्हा डिसेंबर १९९९ ते मार्च २००० पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
२००९ ते २०१४ या काळात ते सुंदरगडचे खासदार होते. बिस्वाल हे ओडिशाचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते.
बिस्वाल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे होते.
बिस्वाल यांचे उर्मिलाशी लग्न झाले होते आणि त्यांना पाच मुली होत्या. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी भुवनेश्वर येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांना न्यूमोनिया आणि कोविड-१९ या आजारांनी ग्रासले होते.
हेमानंद बिस्वाल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.