हृदयरोग (Cardiovascular Disease)
, हृदय आणि रक्तवाहिन्या (धमनी, शिरा व केशवाहिन्या) संबंधित रोगांचा अभ्यास करतो.
प्रामुख्याने हृदय-संवहन तंत्र, मेंदू, मूत्रपिंड व परिधीय धमन्या (PAD) संबंधित रोगांना हृदयरोग म्हणतात. हृदयरोगाची अनेक कारणे असू शकतात, परंतु उच्च रक्तदाब व एथेरोस्क्लेरोसिस ही प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर, वयाबरोबर हृदयाच्या संरचनात्मक व शरीरक्रियात्मक बदलांमुळेही हृदयरोग उद्भवतो, जे निरोगी व्यक्तींनाही होऊ शकते.
१९७० नंतर विकसित देशांमध्ये मृत्युदर कमी झाला असला तरी हृदय व रक्तवाहिन्यांचे विकार हे जगभरात आणि आफ्रिका वगळता इतर सर्व प्रदेशांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण आहेत त्याचवेळी, मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण व त्यामुळे होणारे मृत्यू वेगाने वाढत आहेत. जरी हृदयरोग प्रौढांना होतो, तरी हृदयरोगाची पूर्वावस्था एथेरोस्क्लेरोसिस खूप आधीपासूनच सुरू होते. म्हणूनच पौष्टिक आहार, शारीरिक श्रम, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे यांद्वारे हृदयरोग प्रतिबंधावर भर दिला जातो.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.