इंग्रजी नाव - Nimbostratus Cloud
इंग्रजी खुण - Ns
मध्य पातळीवर तयार होणाऱ्या ह्या ढगाचा रंग राखाडी किंवा काळसर असतो. ह्या ढगाला विशिष्ट आकार असतं नाही. हे ढग संपूर्ण आकाशभर पसरलेले आणि त्यामुळे सर्व आकाशाला काळसर छटा देणारे असू शकतात. ह्या ढगांच्या जाडीमुळे सूर्यकिरण पूर्णपणे अडवले जातात आणि त्यामुळे ढगांचा तळ सहसा स्पष्टपणे पहावयास मिळत नाही. वरून प्रकाश पडल्यामुळे हे ढग काहीवेळा आतून प्रकाशमान झाल्यासारखे वाटतात. मध्य पातळीवर तयार होणारे हे ढग उभ्या आडव्या बाजूस प्रसरण पाऊन निम्न पातळीवरही आलेले आढळतात. पर्जन्यवृष्टी होतानाही ते खालच्या पातळीवर येतात त्यामुळे वर्षास्तरी मेघ हे निम्न पातळीवरीलही मानले जातात. ढगांचे तापमान - 10 सें पेक्षा जास्त असल्यास हे ढग सूक्ष्म जलबिंदूचे तर तापमान -10 सें ते -20 सें पर्यंत असल्यास वरच्या भागात हिमकण आणि तळभागात जलबिंदूचे बनलेले असतात. मात्र तापमान जर -20 सें पेक्षा कमी असेल तर हे ढग हिमकणांचे बनलेले आढळतात.
ह्या ढगांपासून हलका पण दीर्घकाळ पाऊस किंवा हिमवर्षाव होऊ शकतो. वृष्टीच्या वेळेस ह्या ढगातून वीज पडत नाही वा गडगडाटही ऐकू येत नाही.
वर्षास्तरीमेघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?