इंग्रजी नाव - Cumulus Cloud
इंग्रजी खूण - Cu
निम्न पातळीवर आढळणारे हे राशीमेघ जलबिंदू किंवा अतिशीत जलबिंदू किंवा हिमकणांचे किंवा ह्या सर्वांच्या मिश्रणाचे बनलेले आढळून येतात. ह्यांचा आकार कापसाच्या राशी एकमेकावर ठेवल्याप्रमाणे असून ढगांच्या कडा स्पष्ट ओळखू येतात. ढगांचा तळ एकाच क्षितिजसमांतर पातळीत आढळून येतो. शिखराचा भाग घुमट किंवा मनोऱ्याप्रमाणे दिसतो पण ढग फार उंच वाढल्यास वरच्या भागाचे फुलकोबीशी साम्य वाटू शकते. विमानातून पाहताना वरून सूर्यप्रकाशात नाहून निघालेले खाली पसरलेले हे ढग पांढरेशुभ्र दिसतात. मात्र जमिनीवरून पहिले असताना डोक्यावर आलेल्या ह्या ढगांचा तळ काळसर दिसतो व कडा रंगीत दिसतात. राशीमेघ हे एकएकटे, एका पाठोपाठ रांगेत किंवा मोठ्या समूहात आढळू शकतात.
राशीमेघ हे आर्द्र हवेत ऊर्ध्वगामी वातप्रवाहामुळे निर्माण होतात.
राशीमेघ हे चांगल्या हवेचे निदर्शक मानले जातात. त्यातून वृष्टी सहसा होत नाही पण त्यांचे रूपांतर इतर प्रकारच्या ढगात होऊन उदा. वर्षास्तरी किंवा गर्जन्मेघ, नंतर वृष्टी होऊ शकते.
राशीमेघ
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.