इंग्लिश नाव - stratocumulus; स्ट्रॅटोक्युम्युलस
इंग्लिश खूण - Sc
निम्न पातळीवरील हा ढग संपूर्णपणे सूक्ष्म जलबिंदूचा बनलेला असून पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा असतो. हा ढग गोलाकार पण मोठ्या मेघखंडांच्या रेषा किंवा लाटांच्या समूहरूपात आढळून येतो. हे ढग संपूर्ण आकाश व्यापू शकतात पण त्यांची रचना लाटांप्रमाणे असते. लाटांमधील मेघविहीन पोकळीतून आकाश स्पष्ट दिसू शकते. ह्या ढगांची जाडी कमी असते व ढगांचा आकार मक्याच्या लाहीसारखा तर तळपृष्ठभाग काळसर असतो. ह्या ढगांच्या अस्तित्वामुळे आकाश ढगाळलेले जाणवते. ह्या ढगांमुळे ऐन हिवाळ्यात दीर्घकाळ थंडी कमी झाल्याचा तर उन्हाळ्यात तापमान कमी झाल्याचा अनुभव येतो.
स्तरराशीमेघातून क्वचितच वृष्टी होते. झाल्यास अत्यंत हलक्या स्वरूपात पाऊस किंवा हिमवृष्टी होते. हवामान बिघडण्यापूर्वी असे ढग आढळत असल्यामुळे ह्या ढगांचे आगमन म्हणजे हवा बिघडण्याची म्हणजे वादळाची किंवा जोरदार वाऱ्याची सूचना मानली जाते.
स्तरराशीमेघ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!