२२°चे खळे (इंग्लिश:हेलो) आकाशात ढगांतील हिमकणांमुळे तयार होणारे एक प्रकारचे तेजोवलय आहे. यामध्ये सूर्य किंवा चंद्राभोवती आकाशात अंदाजे २२° त्रिज्येचे वर्तुळाकार तेजस्वी कडे तयार झालेले दिसते. अशा कड्याला खळे म्हणतात. आकाशात तंतुमेघ किंवा तंतुस्तरमेघ आले असता सूर्यप्रकाश किंवा चंद्राचे चांदणे/किरण जेव्हा /e ढगातील सूक्ष्म पण लक्षावधी षटकोनी हिमकणातून आरपार जातात तेव्हा त्यांचे वक्रीभवन होते आणि त्यामुळे असे खळे दिसते. २२° खळे हे बरेच मोठे म्हणजे आपला हात आकाशात सूर्य किंवा चंद्राच्या दिशेने पूर्ण लांब केला असता पसरलेल्या तळहाताएवढी अंदाजे त्रिज्या असेल तेवढे दिसते. असे खळे हे सर्वसाधारणपणे आकाशात बऱ्याच वेळा म्हणजे इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा दिसते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२२° खळे
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.