सह्याद्रीच्या कुशीत वसलेली विकासवेडी आदर्शगाव गावडेवाडीने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात वेगाने प्रगती केली. अशा गावात १९९४ साली ग्रामस्थांनी श्री.दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून हिरकणी विद्यालयाचे रोपटे लावले. गावाच्या इतिहासात चिरस्थायी मांगल्याचे काम आपण सर्वांनी हातभार लावल्याने साकार होत आहे . सुंदर कलाकृती निर्माण होऊ पाहणे, दर्जेदार शिक्षण देऊन भविष्याची उज्वल नव्या वाट दाखविण्यासाठी या विद्यालयाची उभारणी केली. या उभारणीत विविध संस्था, ग्रामस्थांचे फार योगदान आहे .संस्थापक अध्यक्ष श्री. शंकरराव पिंपळे आण्णा व सर्व संचालकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यालयाने यशाची उत्तुंग भरारी घेतली असून आपल्या स्नेहामुळे हे कार्य करण्यास नक्कीच प्रेरणा मिळेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिरकणी माध्यमिक विद्यालय
या विषयातील रहस्ये उलगडा.