मानवी जन्माच्या आधीपासून( गर्भाधान संस्कार) ते त्याच्या मृत्यूनंतरही ( दाहकर्म व श्राद्ध) केले जाणारे संस्कार हिंदू जीवनशैलीत प्रचलित आहेत. दिवंगताविषयी आस्था,प्रेम , सद्भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून दाहकर्म व श्राद्ध या विधीकडे पाहिले पाहिजे असे वाटते.
भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणा-या वैदिक साहित्यात ;मृत्यूनंतर केल्या जाणा-या दहनाचे व दफनविधीचे संदर्भ आढळतात.दहनप्रसंगी म्हटल्या जाणा-या प्रार्थनेत मृत शरीराला स्वतःमध्ये सामावून घेण्याची विनंती अग्नीला केली आहे.
दिवंगत व्यक्तीच्या शरीराचे दहन व्यवस्थितपणे व्हावे.जे तपाच्या योगाने अजिंक्य झाले, उच्च पदाला पोहोचले अशा थोर लोकांकडे दिवंगताने गमन करावे असेही अग्नीला सांगितले आहे. आपण मृत झालेल्या अचेतन शरीराला प्रेत असे सामान्यत: संबोधतो. प्रेत म्हणजे अपवित्र असा अर्थ नसून प्र+ इत म्हणजे जो या लोकाच्या (पृथ्वीलोकाच्या) पलीकडे गेला आहे असा. त्यामुळे दिवंगत व्यक्तीच्या अचेतन शरीराची योग्य ती व्यवस्था करीत असताना त्यामध्ये मनात पवित्र भाव आणि दिवंगताविषयी आदरभाव असावा.
एके काळी अंत्येष्टीत(मरणानंतर केलेल्या जाणाऱ्या संस्कार)पाळल्या जाणाऱ्या काही जुन्या हिंदू प्रथा :
द्वि व त्रिपुष्कर योग, पंचक, इत्यादी कुयोग टाळून त्यानुसार, संमतविधी करून मृताचा दहनविधी करावा. वर्ज्य वार व वर्ज्य नक्षत्रे टाळून अस्थिसंचय करावा. त्यानंतर दहा दिवसांच्या आंत, अस्थी तीर्थात नेऊन टाकाव्यात. नंतर श्राद्धविधी करावा.
अन्त्येष्टी संस्कारामध्ये यम देवतेची स्तुती केली जाते. यमाला विनंती केली जाते की दिवंगताचे दहन व्यवस्थित पूर्ण होवो. त्याचे चर्म होरपळून टाकू नकोस.या दिवंगताला तू त्याच्या पितरांकडे ने.आमच्या कन्या-पुत्र यांना अयोग्यवेळी (लहान वयात) तू मारू नकोस आणि आमच्यावर कृपादृष्टी ठेव.
हिंदू धर्मातील अंतिम विधी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?