सुतक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सुतक ही हिंदू धर्मातली एक प्रथा आहे. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ.

सुतकालाच अशौच असेही म्हणले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर १ ते १३ दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. रामायण, स्मृतिग्रंथ, पुराणे, गृह्यसूत्रे अशा विविध ग्रंथांत याविषयी उल्लेख किंवा माहिती दिलेली आहे. वस्तुतः ज्या काळात स्वच्छतेची आणि जंतुसंसर्ग टाळण्याची साधने पुरेशा प्रमाणात उपल्ब्ध नव्हती, त्याकाळात ही प्रथा अस्तित्वात आली असावी. सुतक संपल्यावर निधनाचा शोक कमी झाला असल्याने पुनः आपल्या दिनक्रमाची सुरुवात करण्याचा संकेत प्राचीन काळी रूढ होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →