हिंदुस्तानी पद्यशास्त्र

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हिंदुस्तानी भाषा भारतात लाहोर ते लखनऊ या भागात उदयास आली. या भाषेची शब्दसंपदा संस्कृत, फ़ार्सी, अरबी इत्यादी भाषांनी समृद्ध झाली आहे. हिंदुस्तानी भाषेच्या दोन रीती आहेत: संस्कृतला जवळ असलेली व देवनागरी लिपी वापरणारी हिंदी भाषा, आणि, फ़ार्सीला जवळ असलेली व नस्तालिक़ लिपी वापरणारी उर्दू भाषा. हिंदुस्तानी भाषा हिंदी, उर्दू, रेख़्ता, खड़ी बोली, हिंदवी इत्यादी नावांनीही ओळखली जाते. हिंदुस्तानी पद्यशास्त्राच्या दोन परंपरा आहेत: पिंगल आणि अरूज़. हिंदी रीतीमध्ये पिंगल परंपरा आणि उर्दू रीतीमध्ये अरूज़ परंपरा यांचा वापर अधिक होतो.

हिंदुस्तानी पद्यशास्त्र मराठी भाषिकांसाठी दोन कारणांनी महत्त्वाचे आहे. (1) हिंदुस्तानीच्या संपर्काने अनेक मराठी कवींनी अरूज़ी परंपरेत रचना केल्या आहेत, आणि (2) हिंदुस्तानी चित्रपटांमुळे अरूज़ी परंपरेतल्या अनेक हिंदुस्तानी कविता मराठी भाषिकांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. ग़ज़ल ही अरूज़ी परंपरेतील काव्याची रचना मराठीतसुद्धा लोकप्रिय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →