भुजंगप्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. यात लघुगुरूक्रमानुसार शब्द येतात. याचे ४ खंड असून, प्रत्येक खंड हा १२ मात्रांचा असतो. एकूण अक्षरे ४८, एकूण मात्रा-४८, यती ६ व्या अक्षराअंती. यती म्हणजे थांबणे.
हे वृत्त मराठीत मोठ्या प्रमाणात वापरले गेले आहे. समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक याच वृतात आहेत.
उर्दू काव्यातही हे वृत्त खूप लोकप्रिय आहे. याचे उर्दू काव्यातील नाव- मुतकारिब मुसम्मन सालिम बहर असे आहे. (बहर या शब्दाचा उच्चार बेहेर असा होतो, म्हणजे अहमदचा जसा अहेमद तसा. बहर म्हणजे वृत्त )
भुजंगप्रयातचा लघुगुरू क्रम असा आहे -
ल म्हणजे लघु अक्षर आणि गा म्हणजे गुरू अक्षर. लघु अक्षराची १ मात्रा आणि गुरू अक्षराच्या २ मात्रा.
उर्दू छंदशास्त्रात याचे गण खालीलप्रमाणे
फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन
फऊलुन फऊलुन फऊलुन फऊलुन
उदाहरणे:
१) मनोगतवरील प्रवासी महाशयांची 'तुलाही मलाही' ही गझल या वृत्तात आहे.
कशी को । ण जाणे । अकस्मा ।त लाट
कशी कोण जाणे अकस्मात लाट
दुभंगून जाई तुलाही मलाही
कधी भेट होई? अता राहवेना
प्रवासी जराही, तुलाही मलाही
----- प्रवासी महाशय
( मात्रा नीट समजण्यासाठी पहिली ओळ खंड पाडून दाखवली आहे)
२)
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
-----सुरेश भट
३)
गज़ल उसने छेडी मुझे साज़ देना
जरा उम्रे-रफ्ता को आवाज़ देना
---- सफी लखनवी
४)
अता राहिलो मी जरासा जरासा
उरावा जसा मंद अंती उसासा
गडे सांग हा घाव आहे कुणाचा
तुझा चेहरा वाटतो पाहिलासा
---सुरेश भट
टीप :- माधव ज्युलियनांच्या छंदशास्त्र पद्धतीनुसार लगा पद्धतीने वृत्त चटकन समजते, असा समज आहे. त्यामुळे त्याप्रमाणे येथे दिले आहे. य य य य असे दिलेले नाही. यरतनभजसम प्रमाणे ही वृत्ते लक्षात ठेवता येतात.
भुजंगप्रयात (वृत्त)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.