हरीश रावत ( एप्रिल २७, इ.स. १९४८, मोहनारी, अलमोडा जिल्हा, उत्तराखंड, भारत) हे काँग्रेस पक्षाचे नेते व उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील अल्मोडा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड राज्यातील हरिद्वार लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. २००२ ते इ.स. २००८ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरीश रावत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?