हरी विनायक पाटसकर हे भारतीय वकील, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राजकारणी होते. हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते आणि मध्य प्रदेशचे माजी राज्यपाल होते. ते मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिले. त्यांचा हा कार्यकाळ ७ वर्षे, ८ महिने आणि १० दिवसांचा होता १९६३ मध्ये, सार्वजनिक व्यवहारातील सेवांसाठी त्यांना पद्मविभूषण हा भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरी विनायक पाटसकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.